ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

मलठणच्या नवनिर्वाचित सरपंचानी पदभार स्वीकारताच गावकऱ्यांना दिलं हे मोठं गिफ्ट, संपूर्ण गावाला मोफत मिळणार…

पुणेरी टाइम्स टीम…

दौंड तालुक्यातील पुर्व भागातील मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक असणाऱ्या मलठण ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते, आणि घडलेही तसंच मतदार जनतेने धक्कादायक निकाल देत प्रस्थापित राजकारण्यांना फाटा देवून अपक्ष नवा चेहरा निवडणूक देत राजकारणात केव्हा काहीही होवू शकते हे दाखवून दिले आहे.

सर्वत्र चर्चित असणाऱ्या मलठण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल येताच अनेकांना धक्काच बसला. नवनिर्वाचित सरपंच यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताच नवनियुक्त सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावून महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करीत अभिवादन करीत

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

 

एकमताने गावाच्या विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे‌. नदी पट्ट्यात प्रामुख्याने दुषित पाण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे त्यामुळे मानवी जीवितास दुषित पाण्यामुळे अनेक धोके संभवतात, अपायकारक रोग उद्भवतात त्यामुळे मलठण परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना चोवीस तास मोफत शुद्ध पाणी देण्याचा निर्णय नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी घेतला आहे, सरपंच परदेशी यांनी गावकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट दिल्याने गावात आनंदाचं वातावरण आहे…

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]