पुणेरी टाइम्स टीम- (नागपूर)
जिल्हाधिकारी जळगाव, सक्षम प्राधिकारी जळगाव, उप विभागीय अधिकारी भूसावळ, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव आदी भागांमध्ये सहा महिन्यांकरीता सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पदांवर पदभरती केली जाणार आहे. याची जाहिरात समाज माध्यमांवर फिरत असून यानुसार आता सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पदावर भरती केली जाणार आहे.
तहसीलदारासारखे महत्त्वाचे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ही जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी प्रकाशित केली आहे. त्यानुसार तहसीलदार, कारकून किंवा मंडळ अधिकारी या पदांवर कंत्राटी भरती केली जाणार आहे. यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. असे जाहिरातींमध्ये म्हटले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, (लवाद भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण शाखा) यांच्याकडून या बाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात कोतवाल भरतीची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असताना तहसीलदार यासारख्या महत्त्वाच्या पदाची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याच्या जाहिरातीमुळे कोतवाल सरकारी आणि तहसीलदार कांत्राटी अशी या व्यवस्थेची व्यथा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये या अशा कंत्राटी पद्धतीने अधिकारी भरतीमुळे संभ्रम निर्माण होत आहे…