पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुक्यातील वासुंदे परिसरातील दगड खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला आहे येथील सर्व खाणींची ऑनलाईन एटीएस मशीनद्वारे मोजणी होणे गरजेचे आहे. येथील खाणींची तपासणी पारदर्शक तपासणी केल्यास यातून मोठ्या प्रमाणात राज्य शासनास महसूल मिळू शकतो..
- कोणत्याही जमिनीतून, कोणतेही नैसर्गिक उत्पन्न (झाडे सोडून) अनधिकृतपणे व नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर उत्खनन केल्यास त्या व्यक्तीकडून शासनाला त्यांची किंमत देण्यास आणि परवानगी शिवाय अशा रीतीने काढलेल्या नैसर्गिक उत्पन्नाच्या किमतीच्या पाचपटी एवढा दंड करण्याचा व वसुल करण्याचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम २४ कायदा आहे, अशी किमत व दंड जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे तिच्याकडून वसूल करण्यात येईल असे नमुद आहे. परंतु या अधिनियमाची अंमलबजावणी होण्यासाठी खाणीची तपासणी पारदर्शक होणे गरजेचे आहे.
दौंड तालुक्यातील अनेक खाण माफीयांनी खाण तपासणी साठी असणाऱ्या अटी व शर्तीचा अवलंब केलाच नाही, प्रामुख्याने दौंड तालुक्यातील वासुंदे येथील खाण व्यवसायिकांकडे दैनंदिन दगड उत्खनन नोंदवही, दैनिक दगड क्रशिंग व उपलब्ध खडी नोंदवही, दगड खडी विक्री नोंदवही, कॅश मेमो, (कॅश मेमोतील विक्रीचा दर दर्शविण्यात येत नाही) यापैकी कोणत्याही नोंदींची नोंदवही खाणमालक यांच्याकडे नाहीत, त्यामुळे संबंधित खाणधारकांनी शासनाकडून उत्खनन परवानगी घेतलेले गौण खनिज आणि प्रत्यक्षात केलेले उत्खनन यांचा ताळमेळ नाही. खाणीतून किती ब्रास दगड उत्खनन केला आहे, आणि किती ब्रास खडी स्वरूपात उत्पादित करुन विकला आहे याचा ताळेबंद लागणं शक्यच नाही, यातुन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करीत खाण क्रशर व्यवसायिकांनी आपली पोळी भाजून घेतली आहे, तसेच खाण तपासणी नमुन्यातील कित्येक नियम पायदळी तुडविले जात असताना अनेकदा ग्रामपंचायत कार्यालय वासुंदे यांनी ग्रामसभेमधील ग्रामस्थांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय सासवड, तहसीलदार दौंड यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु खनिकर्म विभाग कसल्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी पुढे येत नाही, मग नियम फक्त कागदालाच आणि सर्वसामान्य जनते लागू होतो का?असाही प्रश्न निर्माण होत आहे.
वासुंदे ग्रामपंचायत कार्यालयाने दाखल करण्यात आलेली तक्रारीवरून मंडळ अधिकारी कार्यालय पाटस येथे सुनावणी झाली असुन रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे, तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नायब तहसीलदार शरद भोंग यांनी सांगितले…