ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

अष्टविनायक महामार्गावर रस्ते ‘सुरक्षिततेचा’ मुद्दा ऐरणीवर, सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा ‘फंडा’ प्रवाशांच्या जीवावर

पुणेरी टाईम्स टीम

पुणे जिल्ह्यासाठी महत्वकांक्षी ठरवणारा अष्टविनायक महामार्ग दौंड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गेला असून या मार्गाचे काम पूर्णत्वास गेले आहे. सदर मार्गावरती अनेक ठिकाणी तांत्रिक बाबींची उणीव, धोकादायक क्षेत्र, अपघात प्रणव क्षेत्र, यांची उणीव या प्रकल्पात प्रकर्षाने जाणून येत आहे. त्यामुळे या महामार्गावरती अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे…

खोरवडी (ता.दौंड)येथील अष्टविनायक महामार्गावर गावदर्शक फलक कमान रात्रीच्या वेळी एका अज्ञात वाहनाच्या धडकेने रस्त्याच्या मधोमध पडली व ते वाहन त्या ठिकाणाहुन निघुन गेले. रात्र असल्यामुळे त्याठिकाणी आजुबाजुला वाहन नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला खरा, मात्र दुसऱ्या दिवशी दुपार पर्यंत या फलकाकडे ना कोणी अधिकारी, ना कोणी कर्मचारी, ना कोणी ठेकेदार फिरकलेच नाही मात्र उशिरा संबंधित कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन रस्त्याच्या मधोमध पडलेल्या फलकाला मालवाहतूक ट्रकमध्ये भरुन नेले.

रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावरील कमानीची उंची ही 5.50 मीटर इतकी हवी असते मात्र या कमानीची उंची ही 5.25 मीटर एवढी होती त्यामुळे ठेकेदार धार्जिण्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वसामान्यांचे जीव गेल्यावर जाग येणार का? असावा सवाल स्थानिकांना पडत आहे. संबंधित फलकाची उंची वाढवण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात वाहनाविरुद्ध दौंड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अष्टविनायक महामार्गाचे प्रकल्प संचालक प्रशांत सोनमळे यांनी दिली.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]