पुणेरी टाइम्स टीम…
राज्य शासनाने नवीन गौण खनिज वाहतुकीचे धोरण अवलंबले असून या धोरणास महसूल प्रशासनाने हरताळ फासल्याचे बारामती टिपर वाहतूक संघटना यांचे म्हणणे आहे. बारामती टिपर वाहतूक संघटनेने केलेल्या तक्रारीवरून तरी गेंड्याची कातडी पांघरून झोपेचे सोंग घेतलेल्या निर्भीड महसूल प्रशासनास जाग येणार का? महसूल प्रशासनाच्या अशा वागण्याने महसूल मंत्र्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासन काय भुमिका घेणार हे पहाणे गरजेचे आहे.
सदर तक्रारीबाबत महसूल प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषणही करण्याचा इशारा बारामती टिपर वाहतूक संघटनेने दिला आहे याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी बारामती तहसीलदार बारामती तहसीलदार दौंड यांना देण्यात आले आहे…