पुणेरी टाइम्स टीम
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार डोके वर काढत असताना नेवासामध्ये दंडाधिकारी दर्जाचे अधिकारी असणारे संजय बिरादार यांच्यावर आंदोलन स्थळी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सदर हल्ला करणारे आरोपी अद्याप मोकाट असल्याने पुणे जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी एकत्र येत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे हल्लेखोरांना अटक करण्याची व संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांना तात्काळ पदावरून दूर करण्याची मागणी आज केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ३०.०८.२०२३ रोजी नेवासाचे तहसिलदार संयज बिरादर यांना रास्ता रोको आंदोलन प्रसंगी उपस्थित असतांना त्यांचेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदर प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेले नाहीत. सदर ठिकाणी तहसिलदार श्री. संजय बिरादर, हे शासनाचे प्रतिनिधी व तालुका दंडाधिकारी या नात्याने उपस्थित होते. त्यांचे सोबत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवणेसाठी पोलीस निरिक्षक डोईफोडे व पोलीस तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी दर्जाच्या जर जमावाकडून मारहाण होत असेल आणि एवढी मोठी घटना होवून देखील उशिराने गुन्हा नोंद करण्यात येऊन संबंधित आरोपींना अटक करण्यात येत नसेल तर सामान्य जनतेच्या मनात एकंदरीत शासनाची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता आहे. सदर ठिकाणी जमाव जमा होवून दंगल परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत असताना देखील संबंधित हल्लेखोरांना अद्याप अटक न झालेने सर्व तहसिलदार पदी कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे असेही निवेदनात म्हटले आहे.
श्री. संजय बिरादर यांचेवर हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सदर हल्लेखोर यांची प्रवृत्ती पाहता
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
तहसिलदार श्री. संजय बिरादर यांना नेवासा तालुक्यात असेपर्यंत २४/७ सशस्त्र सुरक्षा रक्षक देण्यात यावा. तसेच हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सदर प्रकार पोलीसांच्या उपस्थितीत घडूनही त्यांना कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करता आले नाही हे स्पष्ट होत असल्याने संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांना पदावरुन तात्काळ दुर करण्याची व त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे पुणे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि आज जिल्हाधिकारी पुणे यांना केली आहे. सदर निवेदनामधील मागणीचा तात्काळ विचार करुन कारवाई होण्याची विनंती करण्यात आली आहे.