पुणेरी टाइम्स टीम-
अंतरवाली सराटी जालना या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनात बसलेल्या आंदोलनकर्त्याना पोलीसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला, व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यांसाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कोणाच्या आदेशाने हे घडले, याचा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हांला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.
मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणुकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून त्या राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार आहे. तरी जे यात दोषी असतील त्यांच्यावर त्वरीत कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जखमींना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने करण्यात येत आहे. तरी याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, शासनाने मराठ्यांच्या मागणीचा तातडीने विचार करावा अन्यथा आगामी काळात होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा परिणामास सर्वस्वीपणे सरकार जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.असे निवेदनात म्हटले आहे..