ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

– महादेव जानकर यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात जन स्वराज झंझावात, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर मधील राजकीय समीकरणावर होणार परिणाम

निलेश जांबले, पुणेरी टाइम्स – दौंड
राष्ट्रीय समाज पक्ष, व माजी मंत्री महादेव जानकर आयोजित जन स्वराज यात्रेनिमित्त महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात गाव भेट दौरा सुरू केला आहे. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 पासून इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहर, तरंगवाडी, निमगाव केतकी, वरकुटे, काटी, शहाजीनगर, लाखेवाडी, रेडणी,खोरोची, निरवांगी, निमसाखर, वालचंदनगर, कळस, लालपुरी, लासुर्णे, बोरी,काझड, भिगवण, मार्गे दौंड तालुक्यातील राजेगाव वाटलूच मलठण, काळेवाडी, बोरवेल, खोरवडी ,लिंगाळी, बोरावके नगर, दौंड शहर, बेटवाडी, पाटस, कानगाव, चौफुला, या ठिकाणी जन स्वराज यात्रेचा झंझावात दौरा होणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी माजी मंत्री महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या द्वारा जन स्वराज यात्रेचे आयोजन केले आहे.माजी मंत्री महादेव जानकर यांचा तळागाळातील असणारा जनसंपर्क जनस्वराज यात्रेच्या निमित्ताने आणखी मजबूत होणार असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकातील राजकीय समीकरणावर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे महादेव जानकर यांचा जन स्वराज यात्रेची अनेकांना धास्ती आहे…

Leave a Comment

[adsforwp id="47"]