पुणेरी टाईम्स दौंड
कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील आस्क केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर 33 – २ एमआयडीसी कुरकुम या कंपनीच्या भूखंडामध्ये मेल्झर केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कच्चामाल नियमबाह्य बेकायदेशीर पद्धतीने ठेवण्यात आलेलाआहे. सदरचा नियमबाह्य पद्धतीने ठेवलेल्या कच्चामालाचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आस्क केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीला तुम्ही तातडीने संग्रहित कच्चामाल आणि एम/एस अंतिम उत्पादने शिफ्ट करा असे आदेश दिले आहेत.
तसेच सुनावणी दरम्यान तुमचे उत्तर आणि तांत्रिक सबमिशन आणि उपप्रादेशिक अधिकारी पुणे यांचा अहवाल लक्षात घेऊन तुम्हाला हे अंतरिम निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत असे नोटिसात म्हटले आहे…