पुणेरी टाइम्स – दौंड
कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील ऑनर लॅब लिमिटेड कंपनीत चोरी करुन ५ लाख ४० हजार रुपये किमतीची व १२ किलो वजनाची एम. एन. एस. २, (मॉन्टीलूकास्ट सोडियम) पावडर चोरून घेऊन जाताना रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. तत्परतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात कंपनीच्या वतीने फिर्याद देण्यात आली आहे. पाचही परप्रांतीय संशयित आरोपींना दौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत गुरुवारी (दि. २४) दौंड पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष योगेंद्रनाथ मिश्रा (मूळ रा. साउथ कॉलनी, तहसील साहेबगंज, राज्य झारखंड), पवनकुमार चिकरमाराम भारती (मूळ रा. गावापूर,
तहसील मरमदाबाद, राज्य उत्तर प्रदेश), जितेंद्रकुमार गोपीनाथ तुरी (मूळ रा. पहारपूर, पोस्ट दुर्गापूर, तहसील तीन पहाड, जि. साहेबगंज, राज्य झारखंड), विजयकुमार मोतीमंडल (मूळ रा. विजयनगर इथारी बरियापूर, जि. मुंगेर, राज्य बिहार) आणि राजकुमार पत्तरदिन पुष्पाकार (मूळ रा. वैष्णव रेसिडेन्सी, राजपिपला रोड, गोखल, भरूच, राज्य गुजरात) अशी गुन्हा दाखल
पाच कंत्राटी कामगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
पाचही संशयित आरोपी हे सदर ऑनर लॅब कंपनीत कंत्राटी पध्दतीने कामाला असून, सर्व सध्या कुरकुंभ हद्दीतील विविध भागात राहण्यास आहेत. याच कंपनीतून यापूर्वी बुधवारी (दि. १६) ३१ किलो वजनाची वरील पावडर चोरीला गेली आहे. ही चोरीदेखील याच पाच जणांनी केली असल्याचा संशय आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अरविंद गटकुळ करीत आहेत.