पुणेरी टाइम्स – बारामती
पतंग उडविण्याचा मोह प्रत्येकाला असतो. मात्र हाच पतंग उडविण्याचा मोह तुम्हाला पोलीस स्टेशन वारी घडवून आणू शकतो म्हणून सावधान.
नागपंचमीनिमित्त पतंग उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र सध्या बाजारपेठेत मिळणाऱ्या पतंग व मांजा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत, तर मांजा हा मानवी जीवीतासह सजीव सृष्टी साठी खूप घातक ठरत आहे, असा मांजा विक्री करण्यास प्रतिबंध असतानाही हा मांजा बाजारात येतो कसा हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
पतंग उडवण्याचा आनंद जरूर घेतला पाहिजे परंतु आपला हा आनंद कोणाचं तरी आयुष्य उध्वस्त करणारा नसावा, म्हणून पतंग प्रेमींनी मांजा वापरणे टाळावे, पतंग उडविण्यासाठी दोरागुंडी वापरावी, अन्यथा पोलीस आपल्यावर नजर ठेवून आहेत हे विसरू नये.
याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, तसेच शहर पोलीस यांनी आज बारामती शहरात नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर अधिकृतपणे नायलॉन मांजाची विक्री करणारे दुकानदार यांची दुकानाची तपासणी करून तसेच नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणारे व्यक्तींवर व अल्पवयीन मुलांच्या पालकांवर पर्यावरण संरक्षण कायदा सन 1986 नुसार मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच बारामती शहर पोलीस यांचे पर्यावरण प्रेमी करून आभार मानण्यात येत आहेत.
1 thought on “बारामतीत पतंग प्रेमींना पोलीसांचा दणका, बंदी असलेला नायलॉन मांजा वापरणाय्रांवर पोलिसांची कारवाई”
Nice news network…