ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

७२ वर्षीय वृद्धाने नागपुरात बनवले पुरातन वस्तुसंग्रहालय त्याचे कारण जाणून घ्या mhkd

नागपूर, 21 मे : अगदी लहानपणापासून प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद (Hobby) असतोच. ज्याला ज्यामध्ये आवड असते तो त्या गोष्टींचा संग्रह आणि छंद जोपासत असतो. एखाद्या गोष्टीवर जितकं प्रेम, तितकंच त्याचा संग्रहदेखील मोठा, असतो. अशाच एका संग्रह प्रेमीबाबत (Hobby Lover) आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

घरातील संग्रहालयात एक कोटींहून अधिक रुपयांचे साहित्य –

नागपुरातील किशोर दिवेकर (Kishor Divekar Nagpur) यांची ही कहाणी आहे. त्यांचे वय 72 आहे. त्यांनी  स्वतःच्या छंदाला जोपासण्यासाठी राहत्या घरातच पुरातन वस्तूंच्या संग्रहालयाची (Museum in House Nagpur) निर्मिती केली. आज त्यांच्या या संग्रहालयात एक कोटीहुन अधिक रुपयांचे साहित्य तर 1500 हुन अधिक पुरातन वस्तू पहावयास मिळतात.

70 हून अधिक प्रकारचे अडकत्ते, प्राचीन काळातील वस्तू –

संग्रहालयात प्रवेश करताच आर्ट गॅलरी आहे. यात किशोर दिवेकर यांचे मित्र स्व. जोगळेकर यांनी संग्रहित केलेले कॅमेरे व फोटो पाहायला मिळतात. त्यानंतर मुख्य संग्रहालयाला सुरुवात होते. संग्रहालयात इंग्रजकालीन मापक यंत्र, तलवारी, भाले, शस्त्रे, चिलखत हे आपल्याला पाहावयास मिळतात. याशिवाय या संग्रहालयात 70हून अधिक प्रकारचे अडकित्ते व 30हून अधिक जुन्या काळातील घड्याळही पाहायला मिळतात. प्राचीन काळापासून वापरत असणाऱ्या तबकड्या, पाईप, पट्टी, भांडी तिथे योग्यप्रकारे ठेवण्यात आलेले आहेत.

हेही वाचा – Miniature Museum Pune : पुण्यात आहे भारतातील पहिलं मिनिएचर संग्रहालय; लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही घेतली नोंद

संग्रहालयाचे मुख्य आकर्षण –

किशोर यांनी आपल्या राहत्या घरी हुबेहूब अशी पेशवाई बैठक तयार केलेली आहे. हे संग्रहालयातील एक मुख्य आकर्षण आहे. ही बैठक बघताच आपल्याला पेशवाई घराण्याची बैठक, राजेशाही थाट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. ही बैठक बघताना आपण ही पेशवाई काळात आहोत, असा भासदेखील होतो. विशेष म्हणजे किशोर हे या संग्रहालयासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क स्वीकारत नाही. इथे येणाऱ्याचे प्रत्येकाचे ते स्वतः मनःपूर्वक स्वागत करतात. वयाच्या 72व्या वर्षीही त्यांनी आपला छंद जोपासत स्वत:चे वेगळेपण दाखवले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Leave a Comment

[adsforwp id="47"]