ठळक बातम्या

“वासुंदेतील” जलजीवन मिशनच्या कामातील भ्रष्टाचार झाकण्याची ‘अंगठा छाप’ ठेकेदारावर नामुष्की…वाचा सविस्तर…दौंड तालुका पोलीस पाटील संघाच्या ‘अध्यक्षपदी’ पांढरेवाडीचे विलास येचकर पाटील यांची निवड, गावच्या वतीने नागरी सन्मान सोहळा संपन्न….राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप आकार घेतेय, दौंडच्या सुपुत्राची भाजपाच्या राज्य परिषदेवर निवड, आमदार कुल यांनी केला सत्कार…संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर खराडेवाडीत भीषण अपघात… अपघातात दुचाकीस्वाराचे धडापासून शीर वेगळे, तर चारचाकी स्वाराचाही जागीच मृत्यू…वाचा सविस्तर…क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…

“वासुंदेतील” जलजीवन मिशनच्या कामातील भ्रष्टाचार झाकण्याची ‘अंगठा छाप’ ठेकेदारावर नामुष्की…वाचा सविस्तर…

पुणे टाइम्स टीम…

वासुंदे येथील जल जीवन मिशन योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी  केलेल्या कामात अनेक ठिकाणी तांत्रिक गोष्टींचा अभाव आहे. हे काम शासनाच्या धोरणाप्रमाणे मिळालेल्या ठेकेदाराने न करता आपल्या मर्जीतील एका “अंगठाछाप” ठेकेदाराला दिले आहे. हा ठेकेदार याला तांत्रिक गोष्टीचा शुन्य अनुभव असताना हे काम याला कसे दिले हा संशोधनाचा विषय बनत चालला आहे. विशेष म्हणजे या कामाबाबत काहीही चौकशी करण्यास दौंड पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग धजावत नाही. उलट कार्यालयात याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता संबंधित अधिकारी हे या कामाच्या ठेकेदाराला फोन न करता या “अंगठा छाप” ठेकेदाराला फोन करुन ठेकेदार म्हणून माहिती विचारतात. ही दौंड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर नामुष्की आली आहे. संबंधित काम पूर्ण झाले असे दौंड पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी पाणी पोहोचतच नाही. संबंधित काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसून संबंधित कामाचे रेखांकन डिझाईन कार्यालयाकडे उपलब्ध नव्हते. काम पूर्ण झाल्यानंतर कामाचे रेखांकन करण्यात आल्याची माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. याबाबत दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी काय दखल घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment

[adsforwp id="47"]