पुणेरी टाइम्स टीम… दौंड
दौंड तालुक्यातील पुर्व भागातील, राजकीयदृष्टया महत्त्वाचे असलेल्या मलठण गावच्या उपसरपंचदी आमदार राहुल कुल गटाच्या सोनाली उमाकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे, विद्यमान उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागी उपसरपंच निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. सदर निवडीनंतर सरपंच पारुबाई परदेशी यांच्याकडून सोनाली जगताप यांचे अभिनंदन करण्यात आले आहे…