ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत मिळवून देऊ – आमदार राहुल कुल

पुणेरी टाइम्स टीम…आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा प्रशासनासोबत आज पाहणी दौरा केला आहे. तर नंतर दौंड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत आमदार राहुल कुल बोलत होते. यावेळी प्रशासनात काम करणारे विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दौंड शहर व तालुक्यात नुकसान झालेल्या ठिकाणी भेटी देवून आमदार कुल यांनी माहिती घेतली आहे. में महिन्यात 350 मिलीमीटर एवढा तीव्र पाऊस झाला आहे. त्यामुळे घरे,शेती, रस्ते, पोल्ट्री, कांदा, चाळ, जनावरांचा चारा, मुरघास आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ज्या ठिकाणी व्यक्तीगत नुकसान आहे, त्या ठिकाणी व्यक्तिगत मदत करण्यासाठी आग्रही भूमिका मांडणार असल्याचे कुल यांनी सांगितले.

आपत्तीमध्ये अडचणीच्या ठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात आली आहे. स्थलांतरित लोकांना प्रशासन व स्थानिकांच्या सहकार्याने मदत करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. ताराबाई आहिर या महिलेचा भिंत पडून मृत्यू झालेला आहे,

हातवळण येथे पोल्ट्रीचे जवळपास एक कोटीचे नुकसान झाले आहे. गिरीम येथे पोल्ट्रीचे नुकसान झाले आहे या ठिकाणी भेटी देण्यात आल्या आहेत‌. या पत्रकार परिषदेमध्ये दौंड शहरातील कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला गेला शहरातील प्रश्नांबाबत नगरपालिकेचे अधिकारी यांचे नैराश्य असल्याचे आमदार कुल यांनी सांगितले.

दौंड नगरपालिकेला या आठवड्यात मुख्याधिकारी यांची नियुक्ती होईल तसेच उपविभागीय अधिकारी यांची आठवडाभरात नियुक्ती होईल तसेच कटविकास अधिकारी यांचीही लवकरच नियुक्ती होईल अशी माहिती आमदार कुल यांनी दिली. यावेळी आमदार कुल यांनी बोलताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई करण्यासाठी व मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असे यावेळी सांगितले.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]