पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुक्यातील जुन्या काळातील यशस्वी बांधकाम व्यावसायिक, नागेश्वर कंट्रक्शन चे सर्वेसर्वा, संस्थापक हिगणीगाडा गावचे माजी सरपंच रामचंद्र खंडेराव बोबडे (बोबडे नाना) यांचे अपघाती निधन झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाटस दौंड रोडवर पाटस येथे राहत्या घरासमोर दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये बोबडे यांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे, बोबडे नाना यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक बांधिलकी जोपासत, राजकीय भुमिका जबाबदारीने सांभाळत हिगणीगाडा गावचे सरपंच पद अनेक वर्ष सांभाळत गावच्या विकासासाठी प्रयत्न केले. खडतर परिस्थितीत बांधकाम व्यावसायात यशस्वी होत आपल्या दुसरी पिढीही याच व्यवसायात सक्षम यशस्वी घडवली आहे, उद्योजक नागेश बोबडे व रविंद्र बोबडे यांचे ते वडील होत.