ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……

पुणेरी टाइम्स टीम…

     दौंड पोलीस स्टेशन हद्दीत कुरकुंभ MIDC परिसरात दिनाक 03/11/2024 रोजी रात्री CETP प्लांट येथील फिर्यादी नामे मनीष कुंडलिक बारवकर, व्यवसाय बांधकाम व्यवसाय यांच्या सेंट्रींग च्या बांधकाम कामावरिल ठिकाणावरून अज्ञात इसमाने सेंट्रींग च्या लोखंडी प्लेट चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तात्काळ मा. पोलीस निरीक्षक, श्री गोपाळ पवार यांनी सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व तपास पथक यांना मार्गदर्शन करून आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे कसून चौकशी केली असता,खालील आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. सचिन अरुण कांबळे राहणार उरळी कांचन, विकास लक्ष्मण तरंगे राहणार – दत्तवाडी उरुळी कांचन, आदित्य बिबीशन अंकुश राहणार – उरुळी कांचन बायपास, रोहित दत्तात्रय कटाळे राहणार – तुपे वस्ती उरुळी कांचन, एक फरारी , वरील सर्व तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी मिळून व सेंट्रींगच्या कामाच्या लोखंडी प्लेट मारुती सुजुकी कंपनीच्या MH 42 BF 6089 या कॅरी गाडीतून चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. चार आरोपींना अटक करून माननीय न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्यात एकूण 47 नग लोखंडी प्लेट व 01नग मारुती सुझुकी कंपनीची कॅरी गाडी असा एकूण 6,14,100/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आणखी अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची दाट शक्यता असून त्याबाबत गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. पंकज देशमुख साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती श्री. गणेश बिरादार साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग श्री बापूराव दडस साहेब व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गोपाळ पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे पोलिस हवालदार अतुल पठाण, संजय नगरे, नवनाथ भागवत, अमोल नरोटे, सुभाष राऊत, गजानन शिंदे, चापोहावा विजय पवार पोलीस अंमलदार सागर म्हेत्रे, रमेश कर्चे यांनी मिळून केली आहे.

Leave a Comment

[adsforwp id="47"]