ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

दौंडचे भाजप महायुतीचे उमेदवार “आमदार राहुल कुल” आज कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार, विजयाच्या हॅटट्रिकचा शंखनाद करायला ‘कुल सेना’ सज्ज…

पुणेरी टाइम्स टीम – दौंड

दौंडचे महायुतीचे उमेदवार राहुल कुल हे आज आपल्या कार्यकर्त्यांसह दौंड शहरात कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत बोलताना आमदार कुल पुढे म्हणाले की गेल्या दहा वर्षात मी दौंड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला असून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मतदारसंघात केली आहे.

हाच निकष ठेवून भाजप आणि मित्रपक्षांनी मला पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी दिली असून, त्यानुसार मी मंगळवारी विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर, योगेश टिळेकर व परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

यावेळी दौंड मधील छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा देखील होणार असून तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला मला आशीर्वाद द्यावे व काम करण्याची संधी द्यावी असेही आमदार राहुल कुल येथील मतदारांना आवाहन केले आहे.

Leave a Comment

[adsforwp id="47"]