ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला पोलीस पाटलांकडून “चिरीमिची” आशा, पाटलांचे मानधन व कामे रखडवून केली जातेय अडवणूक…

पुणे टाइम्स टीम…

प्रशासनातील महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटलांना पुणे ग्रामीण पोलीस दलातील लिपिकांनी चिरीमिरीच्या आशेने विनाकारण वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत.येथील पोलीस पाटलांच्या कामासाठी असणारा लिपिक हा आपल्याच कलेक्टर तोऱ्यात वावरत असतो. त्यामुळे तो स्वतः आपण बडा मोठा अधिकारी असल्याचा अविर्भावात असतो. तुम्ही आमच्याकडे बघा, आम्ही तुमच्याकडे बघतो… तुमची कामे करतो, तुमचे आमच्यावर लक्ष नाही असे हा कर्मचारी वारंवार पोलीस पाटलांना बोलत असतो. दाम दिले तरच काम होत असेल तर पोलीस पाटलांनी न्याय मागायचा कोणाकडे? न्यायाचा हा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. अतिशय दक्ष असणारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या कार्यकाळात ही परिस्थिती सुधारेल अशी आशा जिल्ह्यातील पोलीस पाटलांना होती. पोलीस पाटलांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख नेहमी सकारात्मक असतात. मात्र येथील कार्यालयीन कर्मचारी साहेबांच्या धोरणावर पाणी फिरवत आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या खराब वृत्तीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे, त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची इतरत्र उचलबांगडी करण्याची मागणीही जिल्ह्यातील पोलीस पाटील करीत आहेत.

नुकतेच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे दौंड येथील बैठकीसाठी आले असता पोलीस पाटलांना चार महिन्याचे एकत्रित मानधन देण्यात येईल असे पत्रकारांचे उपस्थितीत सांगण्यात आले होते. मात्र येथील कर्मचारी पोलीस पाटलांचे मानधन वितरणात आपल्या मनाला वाटेल ते धोरण अवलंबत असून विनाकारण पोलीस पाटलांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे चार महिन्याचे मानधन जमा झालेले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस पाटलांना मानधनावर मोठा निधी उपलब्ध करून दिल्याचे जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटलांना हे मानधन मिळण्या बाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज असून चार महिन्याचे एकत्रित मानधन पोलीस पाटलांना द्यावे अशी मागणी अनेक पाटील करीत आहेत. तशा पोलीस पाटलांना आशाही आहेत.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]