पुणेरी टाइम्स टीम…( दौंड ) सर्वत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आहे. दौंड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुरकुभं येथील फिरंगाई मंदिरात मोठ्या प्रमाणात उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. राज्यभरातून या ठिकाणी भाविक नवरात्र उत्सव काळात दर्शनासाठी येत असतात. त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याचे दिसत आहे. येथील नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने कुरकुभं येथील फिरंगाई मंदिर येथे दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांनी भेट दिली आहे. यावेळी मंदिर परिसरातील बंदोबस्ताची पाहणी करून सुरक्षितेबाबतच्या तसेच मंदिर परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या व गर्दीमध्ये महिलांची छेडछाड होणार नाही, तसेच मौल्यवान वस्तू चोरीला जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या योग्य त्या सूचना कुरकुभं पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील साहेब व बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना दिल्या.
