ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

दौंडमध्ये “कुल-थोरात” यांचे कार्यकर्ते पुन्हा येणार आमने-सामने? राजकीय वातावरण तापणार !

पुणेरी टाइम्स टीम… (दौंड)

     विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षांतराच्या तयारीत असल्याची कुजबूज जोरदार सुरू आहे. याच दरम्यान, दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांनी एक मोठे विधान केले आहे. “अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले रमेश थोरात हे शरद पवार गटात जातील असा दावा कार्यकर्ते करत आहेत. तर रमेश थोरात यांनी निवडणूक लढवावी लागेल. कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील महायुतीत बिघाडी होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. दौंड मधील भाजपाचे विद्यमान आमदार राहुल कुल व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात हे दोन्ही दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीत एकमेकांना आव्हान देणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. माजी आमदार रमेश थोरात यांनी तालुक्यातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहचत भेटीगाठी व गावभेट दौरे सुरू केले असून कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी लागेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे ‘पक्ष चिन्ह’ हे जरी अद्याप जाहीर केले नसले तरी निवडणूक लढायची आहे हे मात्र जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यासमोर रमेश थोरात यांचे कडवे आव्हान असणार आहे. तर आमदार राहुल कुल हे मागील दहा वर्षात तालुक्याचा रखलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यात यशस्वी झाल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आमदार कुल यांनी विकास कामासोबतच सामाजिक व आरोग्याची मोठी कामे केली आहेत. त्यामुळे वैयक्तिक कुल यांचे दौंड विधानसभा मतदारसंघांमध्ये पारडे तितकेच जड आहे. कुल आणि थोरात या कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्याविरोधात नेहमी अनेक राजकीय चुरशीच्या लढती पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात व त्यांचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे दौंडची निवडणूक हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे…

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]