पुणेरी टाइम्स टीम… (पुणे) मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांसाठी पुन्हा एकदा लढा सुरू केला आहे. जंरांगे पाटील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून आज सोमवार दिनांक 16 रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून उपोषणास सुरुवात करणार असून, जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. जरांगे पाटलांकडून प्रामुख्याने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करणे, हैदराबाद गॅझेट लागू करणे, सातारा गॅझेट लागू करणे, बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करणे, तसेच मराठा आरक्षण आंदोलन प्रसंगी मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्याबाबतच्या प्रमुख मागण्या या उपोषणा दरम्यान जरांगे पाटील यांनी सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांवरती मनोज जरांगे पाटील हे ठाम असून हे उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहील असे सांगण्यात आले आहे…
