पुणेरी टाइम्स टीम…दौंड तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल यांना मराठा समाजाच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी दौंड येथील पदाधिकाऱ्यांनी वेळ व तारीख मिळणेबाबतचे निवेदन नुकतेच दिले आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली अनेक वर्षांपासून मराठा समाज महाराष्ट्रभर आंदोलन, उपोषण, शांतता रॅली घोंगडी बैठका घेत आहे. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने मोठा लढा उभारला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत असलेल्या भावना व समाजाच्या मागण्यांचे निवेदन आपणास देण्यासंदर्भात आपल्या कार्याकडून वेळ व तारीख मिळणे बाबत निवेदनात मागणी करण्यात आली आहे, याबाबतचे लेखी पत्र जय शिवसंग्रामचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व दौंड तालुका अखंड मराठा समाजाचे मराठासेवक वसंतराव साळुंखे यांनी दिले आहे.
