पुणेरी टाइम्स टीम… शिवसेना वर्धापन दिन आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समीर भोईटे व सचिन अहिर यूथ फाउंडेशन यांच्या विद्यमानाने दौंड तालुक्यातील दुष्काळी पट्टयातील खोर, देऊळगाव गाडा, पडवी, कुसेगाव ,रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे या गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना अत्यावश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती दौंड तालुका युवासेना प्रमुख समीर भोईटे यांनी दिली. एकूण २२ जिल्हा परिषद शाळांमध्ये हे साहित्य वाटप करण्यात आले आहे.
शिवसेना वर्धापन दिन आणि शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस हे जरी निमित्त असले तरी लहानपणी शालेय जीवनात ज्या अडचणी आम्हाला आल्या त्या अडचणी या विद्यार्थ्यांच्या वाटेला येऊ नयेत या भावनेतून सदर वाटप करण्यात आले आहे. हा उपक्रम गेल्या महिनाभरापासून चालू होता. सदर उपक्रम राबवत असताना आपण राजकारणात जरी असलो तरी समाजाप्रती आपली बांधिलकी ही असलीच पाहिजे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण आणि २० % राजकारण या शिकवणीला डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करत आहोत. शिवसेना पक्षाच्या वतीने नेहमीच समाजासाठी उपयोगी उपक्रमाचे आयोजन केले जाते. भगवा सप्ताह या उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले या साहित्याचा उपयोग त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत होईल आणि या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शाळा, शालेय व्यवस्थापन समिती व सहकारी यांचे आभार तसेच हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवणार असल्याचे युवासेना तालुकाप्रमुख समीर भोईटे यांनी सांगितले.