ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

दौडमध्ये गुरुवारी “महाआरोग्य शिबिर, तपासणी ते उपचाराच्या लाखो रुपयांच्या शस्त्रक्रियांचा मिळणार थेट लाभ, गरजू व गरीब रुग्णांनी लाभ घेण्याचे आ. कुल यांचे आव्हान…

पुणेरी टाइम्स टीम… दौंड 

      दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व मोफत उपचार मिळावेत यासाठी दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्या संकल्पनेतून व कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गुरुवार दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत श्री. बोरमलनाथ मंदिर, बोरीपार्धी (चौफुला) येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या महाआरोग्य शिबीरात पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित रुग्णालयांचा सहभाग असून विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार व नियोजित शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असून सर्व नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा अशी विनंती आमदार ॲड. राहुल कुल यांनी केली आहे.यापूर्वी देखील २०१७ ते २०२० अशा सलग ४ वर्षी हे शिबीर घेण्यात आले होते. तसेच कोविड – १९ च्या कालावधीत आमदार कुल यांनी पुढाकार घेऊन सुमारे २०० व्हेंटीलेटर बेड व १०० बेडचा विलगीकरण कक्ष असे ३०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर चौफुला परिसरात सुरु केले होते. त्यामध्ये सुमारे ३५०० हून कोविडबाधित गोरगरीब रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आमदार कुल यांनी आतापर्यंत दौंड तालुक्यासह राज्यभरातील अनेक रुग्णांना शासनच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तपासणी ते संपूर्ण उपचार अशा प्रकारचे हे शिबीर असून, सर्व गरजूंनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले आहे.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]