ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

‘पुणेरी टाइम्सच्या’ बातमीने दौंड सार्वजनिक बांधकाम विभाग “भानावर” ठेकेदाराचे टोचले कान…

पुणेरी टाइम्स कुरकुंभ:- (अलिम सय्यद)

दौंड तालुक्यातील पांढरेवाडी गावातील मुख्य रस्त्यावरील जवळपास दोन ते तीन किमी अंतराचे डांबरीकरण काहीच दिवसांपूर्वी झाले होते. त्या झालेल्या डांबरीकरणाला काही महिन्यातच खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत स्थानिकांनी माध्यम प्रतिनिधींशी संपर्क करुन बातमी प्रसिद्ध केली होती. याचीच दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बातमी आल्यानंतर का होईना जाग आली व संबंधित ठेकेदाराला खड्डे बुजवण्यास आदेश देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

हिंगणिगाडा-रोटी शिव ते पांढरेवाडी असे किलोमीटर दोन ते तीन रस्त्याचे डांबरीकारणाचे काम चार ते पाच महिन्यांपूर्वी झाले होते. परंतु चार ते पाच महिन्यातच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे व तडे पडून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने दोन ते तीन कोटींचा रस्ता चर्चेत आला होता. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याने हे खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत, अनेक ठिकाणी यांत्रिक तांत्रिक बाबींचा अभाव आहे, त्यामुळे ठेकेदाराने खड्डे बुजवून मलमपट्टी केलीय खरी परंतु काहीच दिवसांत परत याच ठिकाणी खड्डे पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रस्ता खराब होऊन तीन कोटींचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबतची सर्व जबाबदारी सावजिनक बांधकाम विभागाचे अधिकारी घेणार का? असा सवाल येथील नागरिक करत आहे.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]