पुणेरी टाइम्स दौड-
मसनेरवाडी तालुका दौंड येथील पोलीस पाटील अश्विनी विजय बगाडे व लिगाळी गावचे माजी पोलीस पाटील विजय विलास बगाडे व कुटुंबियांच्या वतीने अभिनव वही व शालेय साहित्य वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे पोलीस पाटील मसनेरवाडी बगाडे कुटुंबियांच्या वतीने मसनेरवाडी, येडेवाडी, शाहूनगर (जगदाळे वस्ती) येथील प्राथमिक शाळेतील मुलांना इ.1ली ते 4 थी मधील मुलांना वही पेन्सिल शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे पाटील , श्री.वीरधवल जगदाळे पाटील (मा. पुणे जि.प. सदस्य) संचालक. दौंड शुगर मोनिकाताई कचरे अध्यक्ष पुणे जि .महिला आघाडी पोलीस पाटील संघ, श्री.आनंदराव गाढवे अध्यक्ष दौंड ता. पो.पा.संघ– दौंड श्री.महेश भागवत – अध्यक्ष सरस्वती शिक्षण संस्था भाऊसाहेब नगर, माळेवाडी
श्री.गणेश जगदाळे पाटील सभापती कृ.उ.बाजार समिती दौंड, संदीप येडे, संदीप वत्रे श्री.संभाजी काटे-देशमुख प्रगतशील बागायतदार विकी शेलार, अजय गायकवाड, सचिन बबन सोनवणे, श्री.योगेश बोबडे, सौ. निताताई वाघमारे, सौ मीनाक्षीताई आवटे,सौ. रधिकाताई पाहाणे, श्री.महेश लोंढे, श्री.अविनाश शेंडगे, श्री.विठ्ठल बारवकर, सोमनाथ वत्रे, शालेय समितीचे सदस्य व सर्व शिक्षक, शिक्षका, विद्यार्थी विद्यार्थिनी व अंगणवाडी सेविका मदनीस, आशासेविका, तसेच महिला बचत गटांचे अध्यक्ष सचिव व सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.रविंद्र पवार यांनी केले.