पुणेरी टाइम्स टीम…(कुरकुंभ)
कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील सर्व कंपन्यांचे संचालक, व्यवस्थापक पदाधिकारी यांची ईएसआयसी उप-क्षेत्रीय कार्यालय, पुणे संचालक (प्रभारी) पी. सुदर्शनन यांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे संचालक,प्रतिनिधी, मालक यांची बैठक घेवून ईएसआयसीचे कामगारांसाठी असलेले फायदे / योजनाचे माहिती व विश्लेषण करुन दिली. सर्व विषयांची माहितीबाबतचे योग्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
पी. सुदर्शनन यांनी औद्योगिक वसाहत मधील कंपन्यांचे व्यवस्थापक यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन, त्यांच्या शंकेचे निरसन केले व कामगारांसंबंधी व्यवस्थापकांची असणाऱ्या विविध जबाबदाऱ्या / नियमाबाबत जागृता निर्माण केले / प्रत्येक कामगारांचे ईएसआयसी विमा क्रमांकाशी आधार जोडणी करणे व विविध फायदयासाठी (हितलाभ) आवश्यक असणारे ऑनलाईन क्लेम कशा पध्दतीने सादर करावयाची याबाबत सुलभ भाषेत सूचना केल्या.
या कार्यक्रमास कुरकुंभ ईएसआयसी व्यवस्थापक दिनेश वाघमारे, ईएसआयसी शाखा कार्यालय कर्मचारी वर्ग तसेच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील नियुक्ता औद्योगिक वसाहत मधील पदाधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थितीत होते.
जर कामगारांना ईएसआयसी संदर्भात काही अडचणी असल्यास शाखा कार्यालय कुरकुंभ येथे संपर्क साधावा
– दिनेश वाघमारे
(ईएसआयसी व्यवस्थापक कुरकुंभ)