ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

कर्मयोगी सुभाषआण्णा कुल पतसंस्थेचे काम आदर्शवत- माजी आमदार रंजनाताई कुल यांचे गौरवोद्गार.‌‌.

पुणेरी टाइम्स टीम… दौंड 

कर्मयोगी सुभाषआण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत असून संस्थेचे संचालक मंडळ सभासदांना चांगली सेवा देत आहेत. सुभाषआण्णांच्या नावाने असलेल्या या संस्थेने भविष्यात महाराष्ट्रातील एक नंबरचे प्रभावी काम करावे, असे गौरवोद्गार माजी आमदार रंजनाताई कुल यांनी काढले.

संस्थेच्या सभागृहात संस्थेची ९४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्यावेळी कुल बोलत होत्या. यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे सभापती शांताराम जगताप यांनी आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांनी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल धन्यवाद मानले. भविष्यात सर्वांना विश्वासात घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.

यावेळी आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त शिक्षक, विद्यार्थी, इयत्ता दहावी आणि बारावीत यश मिळवले शिक्षकांचे पाल्य, सेवानिवृत्त शिक्षक, पदोन्नती प्राप्त शिक्षक यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

संस्थेचे ७९१ सभासद असून अधिकृत भाग भांडवल २० कोटी आहे. कर्जमर्यादा ३० लाख आहे. या वर्षी संस्थेला १, ३४,७८,८७२ रुपये नफा झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे संस्था पुणे जिल्हा बँकेकडून १० टक्के व्याज दराने कर्ज घेऊन सभासदांना ८.५ टक्के दराने कर्ज देऊनही यंदा सभासदांना ८.५ टक्के लाभांश वाटप केलेला आहे

यावेळी माजी आमदार रंजनाताई कुल, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते आप्पासाहेब कुल, भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, कास्ट्राईब संघटनेचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे, रामभाऊ दोरगे,आप्पासाहेब मेंगावडे, राजूभाई आत्तार, उमेश देशमुख, व्य वस्थापक अविनाश अडसूळ, उपव्यवस्थापक राहुल वाघ, संस्थेचे आजी माजी संचालक आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक सभापती शांताराम जगताप, सुत्रसंचालन संचालक महादेव बंडगर, आभार उपसभापती शंकर भुजबळ यांनी केले. संस्थेने कुटुंब कल्याण योजनेसारखी एक अभिनव योजना सुरू केली असून दुर्दैवाने मयत होणाऱ्या सभासदांचे सगळे कर्ज माफ करून त्यांच्या वारसांना संकटकाळात मदतीचा हात दिला जात आहे

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]