ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना मोठं यश, पुणे जिल्ह्यातील फक्त ‘दौंड’ नगरपालिकेचा “३१ हजार कोटींच्या योजनेत” समावेश, दौंडचे आणखी ‘महत्व वाढणार’ – पुढील वीस वर्षासाठीचा… वाचा सविस्तर बातमी….

पुणेरी टाइम्स टीम… दौंड 

दौंड नगरपालिकेचा समावेश केंद्र शासनच्या अमृत २.० योजनेमध्ये झाला असून या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली आहे. अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत २.०) या योजनेसाठी महाराष्ट्राला सुमारे ३१ हजार ७२२ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी पहिला टप्पा ९ हजार ३१० कोटी वितरीत देखील करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील फक्त दौंड नगरपालिकेचा समावेश अमृत २.० योजनेमध्ये करण्यात आला आहे. या योजनेमध्ये दौंडचा समावेश होण्याने आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना मोठे यश आल्याचे बोलले जात आहे. या योजनेमुळे शहराचा पुढील २० वर्षाचा डीपी प्लॅन तयार होणार आहे. यामध्ये शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे पाणी, जल वितरण व्यवस्था, पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन, प्रत्येक घरात नळ कनेक्शन, पाण्याचा बॅलन्स टॅंक, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झाडांसाठी सांडपाणी वापरण्याच्या योजना अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. या योजनेतून दौंड शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार असून, शहराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. १५ वा वित्त आयोगातून हा निधी वितरीत केला जाणार आहे.

दौंड नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी अमृत २.० योजनेतून केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाकडून मोठा निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिल्ली येथे शहर विकास मंत्री यांचेकडे पाठपुरावा केला होता.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]