पुणेरी टाइम्स टीम (वरवंड)
दौंड अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी साहित्य प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन यांचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार संदीप धुमाळ यांना देण्यात आला आहे.
ग्रामीण भागात लोकांमध्ये साहित्याविषयी प्रेम निर्माण व्हावे त्यांना साहित्याची गोडी लागावी या उद्देशाने दोन दिवसीय भिमथडी मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे. यंदा साहित्य संमेलनाचे हे तीसरे वर्ष आहे. राज्यातील कानाकोपर्यातून या दोन दिवसीय साहित्य संमेलनासाठी मान्यवर उपस्थित होते
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन बोरमलात मंदिर चौफुला,दौंड येथे पार पडले या वेळे ग्रंथ दिंडी, पुस्तक प्रकाशन ,पुरस्कार वितरण, परिसंवाद ,कथाकथन, कवी संमेलन ,नाट्यप्रयोग असे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून साहित्यिक व लेखक कवी उपस्थिती दाखवलेली होती.
वरवंड येथील लोकमत पत्रकार संदीप रघुनाथ धुमाळ यांना यावर्षीचा राज्यस्तरीय भीमथडी आदर्श पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे संदीप धुमाळ यांनी दैनिक लोकमत या अग्रगण्य वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे 2009 साली दैनिक प्रभात या वृत्तपत्रात पदार्पण करत आपल्या लेखणीतून सर्वसामान्य जनते च्या अडचणीं व येणारे प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याचे काम त्यांच्या लेखणीतून दाखवून दिले आहे व लेखणीतून वेगळा ठसा उमटवण्याचे काम करीत आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन सर्व सभासद या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक.संजय सोनवणी,दिग्विजय जेधे,संजय सोनवणे, दिपक पवार, बाळासाहेब मुळीक दशरथ यादव, पत्रकार अक्षय देवडे,मिलिंद शेंडगे, विजय मोरे,रवी खोरकर, आण्णा बारवकर,उपस्थित होते.