पुणेरी टाइम्स टीम…दौंड शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक व भंगाळे हॉस्पिटल परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठून नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे तसेच पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार दौंड येथील व्यापाऱ्यांनी आमदार राहुल कुल यांना केली होती त्यानंतर तातडीने आमदार कुल व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी याबाबत पाहणी करून आवश्य उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते, एरवी गेंड्याची कातडीच्या पांघरून झोपेच्या सोंग घेतलेल्या निघरगठ्ठ प्रशासनाला आमदार कुल यांनी तातडीने प्रश्नी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने प्रशासनाने ऍक्टिव्ह मोडवर येत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.
आमदार कुल यांनी सूचना केल्याप्रमाणे दौंड शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी कुरकुंभ मोरीच्या मेन गटर लाईनला चेंबर जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर भंगाळे हॉस्पिटल जवळील चेंबर सुद्धा मेन गटरलाईनला जोडण्यात येणार आहे. संपूर्ण शहरातील गटरलाईनची सफाई तातडीने पूर्ण करुन शहरातील इतर नागरी व व्यापारी भागात पावसाचे पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दौडकारांना त्रासातून मुक्त करण्यासाठी प्रशासनाने काम सुरू केल्याने आमदार कुल यांचे आभार दौड शहरवासीयांकडून मानण्यात येत आहेत.