पुणेरी टाइम्स – रावणगाव (ता.दौंड) येथील गोदाबाई बापूराव गावडे (वय ६५) यांचे रविवार दि.२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले
गोदाबाई या नेहमी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात परिसरात अग्रेसर होत्या, त्यांनी रावणगाव ग्रामपंचायतीचे सदस्यपद ही भूषविले आहे. दैनिक पुढारीचे रावणगाव येथील पत्रकार तानाजी गावडे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पाठीमागे पती, मुलगा,मुलगी, सून नातवंडे असा परिसर आहे.