ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्याने ‘संविधान बदलाच्या’ ते पुड्या सोडतात, दौंड मधील वैद्यकीय व्यावसायिक व वकीलांच्या मेळाव्यातून अजित पवार यांच्याकडून इंडिया आघाडीवर टिका…वाचा सविस्तर बातमी…

पुणेरी टाइम्स टीम…

मोदींच्या विकासाच्या विरोधात कुठलाही मुद्दा नसल्याने विरोधक संविधान बदलाच्या पुड्या व अफवा सोडायचे काम करत आहेत. हे नवीनच काढले लोकसभेची ही शेवटची निवडणूक आहे हा त्यांना झालेला भास आहे. मुस्लिमांना निवडणुकीनंतर परदेशात पाठवणार हा सोशल मीडियातला प्रचार बकवास आहे. हलक्या कानाचे राहू नका. ४०० पार असा नारा दिला तर चुकीचं काय. खमका नेता, प्रशासनावर पकड, निर्णय घेण्याची क्षमता, पूर्ण बहुमत व स्थिर सरकार असेल तर विकास होतो. दूरदृष्टी असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथे केले. दौंड येथे सिटी अॅव्हेन्यूच्या सभागृहात अजित पवार यांनी वकील व वैद्यकीय संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली व त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. वकील व वैद्यकीय व्यावसायिकांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला व पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले दहा वर्षात मोदींनी संविधानाचा आदरच केलेला आहे. संविधान बदलणार ही अफवा आहे. मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी संविधानाचा आदरच केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळापर्यंत अनेक वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. मी कामाचा हापापलेला माणूस आहे. सत्तेचा नाही. मात्र विरोधी पक्षात बसून विकास होत नाही.२०१४ ची माझी भूमिका कशी बदलली. २०१४ ला मोदींवर टीका करत होतो. २०१९ मध्ये शिवसेनेसारख्या जातीयवादी म्हटल्या जाणाऱ्या पक्षासोबत अडीच वर्षे सत्तेत काढली. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा घेऊन काम करतोय. ही भावकी गावकीची निवडणूक नाही. देशाची निवडणूक आहे. मोदींना पर्याय नाही. वर्षात एकही सुट्टी न घेता काम करणारा नेता म्हणजे मोदी आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात काम करून अनुभव घ्यायला पाहिजे होता. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलनाच होऊ शकत नाही असेही पवार म्हणाले. सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन करताना पवार म्हणाले मागच्या कारकिर्दीतल्या खासदारापेक्षा आमच्या खासदाराची कारकीर्द नक्कीच चांगली राहील महायुतीला मताधिक्य दिले तर बारामती मतदार संघाचा चेहरा मोरा नक्की बदलणार. महायुतीचा खासदार करा दौंडला विद्यानगरी उभी करतो. यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, वासुदेव काळे, प्रेमसुख कटारिया, वैशाली नागवडे विरधवल जगदाळे आदी उपस्थित होते.  अजित पवार यांनी फक्त कमळच चिह्न माहिती असलेल्यांना आवाहन केले — भाजपचे आमदार राहुल कुल, वासुदेव काळे आणि कार्यकर्त्यांना कमळ चिन्ह माहिती आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या विचाराच्या मतदारांना विनंती आहे. निवडून आल्यावर हे घड्याळ तिथे कमळाला पाठिंबा देणार आहे. खडकवासल्यामध्ये थोडा प्रश्न आहे मोदींना मानणारे कमळाचे बटण शोधतात. आम्ही महायुती म्हणून एकत्र आलो आहोत. चिन्हे वेगळी आहेत. कमळ, घड्याळ, धनुष्य, शिट्टी, शेवटी कमळाला पाठिंबा देणार. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करायला हवे होते त्यांनी अनुभव घ्यायला हवा होता असेही अजित पवार म्हणाले खासदार संजय राऊत यांच्या कोणत्याही टीका टिपणीला माझे नो कॉमेंट्स असे उत्तर असेल व दररोज वाजणाऱ्या भोंग्याला प्रत्युत्तर देणार नाही असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या पक्षात कोणी मोठे नेते राहिले नाहीत म्हणून छोट्यांनाही मोठे झाल्यासारखे वाटते अशी टीका त्यांनी रोहित पवारांवर केली.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]