‘तोच जोश तोच दरारा’ साहेब फक्त आवाज द्या, “धनगर समाजाचा पाठिंबा” बारामती लोकसभेत महायुतीचे गणित बदलणार…

BY-पुणे टाइम्स टीम…

बारामती लोकसभेत महायुतीकडून बेरजेचे गणित सुरू असतानाच आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर जात असताना, दौंड बारामतीच्या जिराईत पट्ट्यातील वासुंदे, जिरेगाव, लाळगेवाडी, खराडेवाडी परिसरातील नागरिकांनी गुंजखिळा (वासुंदे) येथे शरदचंद्र पवार साहेब व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे. तर परिसरातील धनगर समाजाकडून राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांना घोंगडी, शाल श्रीफळ देऊन खासदार सुळे यांना लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे धनगर समाजातील बडे नेते जरी महायुतीमध्ये सामील असले तरी सर्वसामान्य धनगर समाज हा शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बारामती लोकसभेचे महायुतीकडून जुळवलेले गणित बिघडणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…

1 thought on “‘तोच जोश तोच दरारा’ साहेब फक्त आवाज द्या, “धनगर समाजाचा पाठिंबा” बारामती लोकसभेत महायुतीचे गणित बदलणार…”

Leave a Comment

[adsforwp id="47"]