पुणेरी टाइम्स टीम (इंदापूर) आमदार भरणे यांच्या अचूक नियोजनाने ऐतिहासिक काम मार्गी लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. शिरसोडी – कुगाव पुलाद्वारे मराठवाडा -पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार.. शिरसोडी – कुगाव पुलाद्वारे पुणे सोलापूर जिल्हा जोडला जाणारा असून दळणवळण गतिमान व सुलभ होणार आहे.
या कामामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव इंदापूर च्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले जाणार आहे. याचे कारणही तसेच आहे. इंदापूर तालुक्यातील शिरसोडी ते कुगाव (ता.करमाळा) उजनी जलाशयावर लांब पुलाचे आज टेंडर निघाले आहे. तब्बल 382 कोटींचा हा पूल असून इंदापूर शहरातील व्यापारी व जनतेच्या मागणीला आमदार भरणे यांच्या प्रयत्नातून हे यश आहे, महाराष्ट्रातील पहिलं उदाहरण की सर्वात कमी वेळात एवढं मोठं काम आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंजूर करून घेतले आहे व त्याचे टेंडर ही निघाले आहे..
मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा हा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असेल. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यातील तब्बल १०० कि.मी.कमी होईल.यामुळे इंदापूर शहराची उलाढाल पाचपट वाढणार आहे. करमाळा व इतर भागातील उसाला पश्चिम भागात मोठी बाजारपेठ निर्माण होईल. त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक विकास होईल. उजनी बॅकवॉटर टुरिझम ट्रँगल परिसर(इंदापूर – भिगवण – करमाळा) विकसित होईल. या पुलामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटा सुकर होऊन जातील , आरोग्याच्या सोयी ग्रामीण भागातील लोकांना सहजतेने उपलब्ध होतील. मासेमारी करणाऱ्या बांधवांना इंदापूर व भिगवण मस्त्य बाजारपेठ काबीज करता येईल.करमाळा तालुक्यातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे आमदार भरणे यांचा जाहीर सत्कार लवकरच करण्यात येईल अशी भावना इंदापूर येथील व्यापार्यानी बोलावून दाखविली आहे..
1 thought on “मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिरसोडी – कुगावचा पुलाचे 382 कोटींचे निघाले टेंडर.. आमदार भरणे यांच्या पाठपुराव्याला यश…”
XyUGORvDoSeI