पुणेरी टाइम्स टीम… (निलेश जांबले)
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, हवेली या 13 तालुक्यामध्ये पोलिस पाटील यांच्या रिक्त जागी नुकत्याच नवीन पोलीस पाटील यांच्या नियुक्ती केल्या आहेत.
या प्रशिक्षणाने आपत्तीवर मात करण्याचे कौशल्य पोलीस पाटलांना अवगत होत असून गावामध्ये अचानक कोणतीही आपत्ती आल्यास पोलीस पाटील त्यावरती सक्षम मात करू शकतात, तसेच दरड कोसळने, भूस्खलन होण्याची संभव्यतः असते, मान्सून कालावधीत गावांचा संपर्क तुटणे, नदी/ नाल्यात मनुष्य किंवा जनावरे वाहून जाणे, अश्या प्रकारची कोणतीही आपत्ती घडल्यास घटनास्थळी तात्काळ पोलिस पाटील उपस्थित होत असतात. पोलिस पाटील यांना घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना / स्त्रोत याची पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास घटनास्थळी तात्काळ काय केले पाहिजे? याबाबत जिल्ह्यातील पोलिस पाटील प्रशिक्षित व सुसज्य असणे गरजेचे आहे.
हे प्रशिक्षण हे पोलीस पाटलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत गाव कामगार पोलीस पाटील संघाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख योगेश बोबडे पाटील व गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य खजिनदार निळकंठ थोरात यांनी यावेळी सांगितले…