ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

हजारो कोटींचे ‘एम डी ड्रग्ज प्रकरण’ आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तडकाफडकी बदली…नक्की काय?

पुणेरी टाइम्स टीम…दौंड पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतला आणि काही दिवसातच आपल्या कामकाजाने सर्व दौंडकरांची मने जिंकली असे सिंघम पोलीस अधिकारी ‘चंद्रशेखर यादव’ यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अवैध धंदे, बेशिस्त वाहतूक, रोड रोमिओ, जबरी गुन्ह्यातील आरोपी अशांना आपल्या खाकी स्टाईलने धास्ती भरवली होती. तसेच आपल्या पोलीस स्टाईलने काम करीत अनेकांना जेरबंद ही केले होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी निम्मबाह्य व बेकायदेशीरपणे पणे सुरू असणाऱ्या उद्योगांना मेटाकुटीला आणले होते. दौंड मधील अतिक्रमणे, बेशिस्त वाहनं, महिला व शालेय मुलींना होणारी छेडछाड, टवाळखोर रोड रोमिओ यांचाही बंदोबस्त करण्यात आला होता. गावठी दारू, जुगार, मटका, वैश्या व्यवसाय, अशा अवैध धंद्यांवर ही छापे मारले होते व ते धंदे बंद केले होते. शिवजयंती व इतर धार्मिक सामाजिक उत्सव यामध्ये कायदा व सुव्यवस्था याचा बरोबर सलोखा राखला होता. त्यांनी आपल्या एक महिन्याच्या कार्यकाळात दररोज काहींना काही नवीन कारवाई करीत अनेक आरोपी, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी, विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी, गंभीर गुन्ह्यातील आरोपी, वासुंदे येथे पालखी महामार्गावरती झालेल्या बँक वसुली एजंटच्या खुणातील मुख्य आरोपी याला काही तासात जेरबंद केले होते. अशा कामगिरीने दौंड पोलीस स्टेशन च्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या विषयी आदराचे स्थान निर्माण झाले होते..

कुरकूंभ औद्योगिक वसाहती मधील मोठ्या प्रमाणात सापडलेले एमडी ड्रग्ज प्रशासकीय पातळीवर मोठा चर्चेचा विषय बनला होता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तडकाफडकी बदली हे प्रकरण शमवण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. मात्र या बदलीने दौंड मधील नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे… धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले दौंडचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तडकाफडकी नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आली आहे, तसे आदेश देण्यात आले आहेत.  मात्र पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या तडकाफडकी बदलीमागे कुरकुभं औद्योगिक वसाहती मधील एमडी ड्रग्स प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणातील राजकीय व  बड्या हस्तीनां वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तडकाफडकी बदली केल्याची चर्चा होत आहे. या बदली मागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कटकारस्थान असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे, तशी सोशल मीडियावर चर्चा होऊ लागल्या आहेत. चंद्रशेखर यादव यांची बदली पोलीस प्रशासनाने केली असली तरी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मात्र दौंड मध्ये नाराजीचा मोठा सूर आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली रद्द करण्याची मागणी स्थानिक करीत आहेत…http://*१५० रेसर कबुतरे चोरीतील उर्वरित ‘त्या’ दोन आरोपींना दौंड पोलीसांनी केले जेरबंद… – Puneri Times* https://puneritimes.com/latest-news/15997/

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]