ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

इंदापूरचे “ग्रामदैवत श्री. इंद्रेश्वर” यात्रेला सोमवारपासून सुरुवात, ‘धार्मिक व सांस्कृतिक’ कार्यक्रमांची मांदियाळी अनुभवण्यास मिळणार…

पुणेरी टाइम्स टीम…

इंदापूरचे ग्रामदैवत असलेले श्री. इंद्रेश्वर महादेवाची ग्रामयात्रा व भव्य रथोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त सोमवारपासून ते शनिवारीपर्यंत इंदापुरात भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी अनुभवण्यास मिळणार असल्याची माहिती ग्रामदैवत श्री. इंद्रेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र वाशिंबेकर यांनी दिली..

कार्यक्रमाची सुरूवात सोमवारी (दि.४) पासून श्री गणेश शिवपंचायतनपूजन व श्री शिवलीलामृत पारायणाने होणार आहे. मंगळवारी (दि.५) श्री शिवलीलामृत पारायण होणार आहे. बुधवारी (दि.६) श्री. गणेश स्थापना व ध्वजपूजन, बालसंस्कार वर्ग व संतवाणी अभंगांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.७) ग्रामदैवत श्री. इंद्रेश्वर महादेवाच्या रथाची सवाद्य मिरवणूक व ध्वज नगरभ्रमणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी इंदापुरातील समस्त तिळवण तेली समाजाच्या वतीने प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी (दि.८) महाशिवरात्री असल्याने हा दिवस यात्रेचा खास दिवस असणार आहे. या दिवशी दिपपूजन, महाआरतीसह रात्री १२ नंतर श्री महादेवास बिल्वपत्र अर्पण सोहळा व महापूजा होणार आहे. यात्रेच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (दि.९) सकाळी १० वाजता हभप संतोष महाराज गाडेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाआरती ५६ भोग व महाआरती होणार आहे.

तरी शहरातील सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी ग्रामयात्रा, रथोत्सव, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे तसेच अन्नदानासाठी ट्रस्टशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामदैवत श्री. इंद्रेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]