पुणेरी टाइम्स टीम…
विवाह सोहळ्यात गर्दीत फायदा घेऊन नवरिचे दागिने खिशातील पैशांची पाकिटे,साहित्यावर डल्ला मारणाऱ्या तीन परप्रांतीयांना दौंड पोलिसांनी जेरबंद केले असून त्यात एका महिला गुन्हेगाराचा समावेश आहे. त्यातील दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभागाचे स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ पोलीस अमलदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, विजय पवार, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते, सुरेश चौधरी, रवी काळे, अशोक जाधव आदींनी केली आहे.