पुणेरी टाइम्स टीम… आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी (पाटस, ता. दौंड) येथे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागरूकता आणि मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (SVEEP) अंतर्गत श्री नागेश्वर विद्यालय पाटस येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यावेळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार डॉ तुषार बोरकर, पाटसचे गावकामगार तलाठी संतोष इडोळे, तसेच उपशिक्षक उत्तम रुपनवर, भोसले सर, ढोले सर आदी मान्यवर उपस्थित होते,….
