ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

दौंड मध्ये धारदार तलवार बाळगून दहशत करणाऱ्याच्या पोलीसांनी तलवारीसह आवळल्या मुसक्या, सविस्तर वृत्त वाचा लिंकमध्ये

पुणेरी टाइम्स टीम (दौंड.दि.५)
आपल्या ताब्यात धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमास दौंड पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेत घेतला आहे.गुरूदास निवृत्ती राऊत (रा.राघोबानगर, गिरीम) असे या इसमाचे नाव असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी,’दि.४ रोजी दौंड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की गिरीम येथे नामे गुरूदास राऊत हा आपल्या ताब्यात धारदार तलवार बाळगून दौंड परिसरात दहशत निर्माण करत आहे ही बातमी मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पोलीस अंमलदारांना पाठवून संबंधित इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेली धारदार तलवारही ताब्यात घेतली आहे.त्यास ताब्यात घेत दौंड पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला आहे. उघडपणे धारदार तलवार बाळगुण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून व दहशत माजवून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे कृत्य करताना कोणी आढळले तर तात्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहे.पुढील तपास पोलिस हवालदार महेश भोसले हे करत आहेत.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]