पुणेरी टाइम्स…
- दौंड तालुक्यातील आई तुकाई देवी महिला भजनी मंडळ पारगाव यांनी भजनीं मंडळाचा वर्षपूर्तीच्या औचित्य साधत श्री छत्रपति संभाजी महाराज यांच्या जयंती दिनी श्री छत्रपति संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदन करीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून भजनीं मंडळाचा वर्षपूर्तीचा कार्यक्रम केला आहे.
पारगावच्या माजी सरपंच जयश्रीताई ताकवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी एक वर्षापुर्वी भजन शिकण्यास सुरवात केली. महिलांना भजन शिकवण्यासाठी कात्रज (पुणे) वरून भजन सम्राट श्री बापू महाराज गायकवाड हे आठवड्यातून दोन दिवस याठिकाणी येत असतात…
छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करताना यावेळी महिलांनी उत्कृष्ट भजनाचा कार्यक्रम संपन्न करीत समाजाला अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी ग्रामस्थांबरोबर सौ.जयश्रीताई ताकवणे, सौ.लक्ष्मी चांदगुडे ,सौ आशाताई ताकवणे, सौ.मंगल सूर्यवंशी,सौ. रेखा भोसले,सौ.विमल ताकवणे, सौ.सुरेखा ताकवणे,सौ.रत्नप्रभा ताकवणे, सौ.दिपाली ताकवणे ,सौ शारदा ताकवणे व हातवळण गावच्या सौ वैशाली मोरे, सौ.रुपाली शिंदे श्री.रमेश पवार आणि श्री.लक्ष्मण मोरे उपस्थीत होते.
शेवटी महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करीत तिळगुळ वाटप केले . सचिन (समाधान) शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले…