पुणेरी टाइम्स टीम…
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री, गृहमंत्री मा. नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमदार राहुल दादा कुल यांच्या मागणीनुसार खडकवासला जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) कि. मी. ४३ (कुंजीरवाडी – लोणीकाळभोर, ता. हवेली) ते कि. मी. १०९ (भागवतवस्ती पाटस, ता. दौंड) एकूण ६७ कि. मी. लांबीच्या अस्तरीकरण व मजबूतीकरण या कामासाठी सुमारे १८८.७५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली,
त्याचबरोबर नवीन दौंड पोलीस स्टेशन इमारत, उपविभागीय पोलीस अधिकारी इमारत व पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी सुमारे ५५.५६ कोटी रुपयांच्या भरगोस निधी मंजूर केल्याबद्दल आज त्यांची आज आमदार राहुलदादा कुल यांनी भेट घेतली.
दौंड तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री, गृहमंत्री मा. नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानले यावेळी आमदार मा. श्री. जयकुमार हे देखिल उपस्थित होते.