पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुक्यातील दैनिक प्रभातचे दौंड तालुका प्रतिनिधी, सा. भिमातीर चे संपादक विशाल धुमाळ यांना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेच्याच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई व माहिती खात्याचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ व संघनेचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांच्या हस्ते नांदेड येथे गौरविण्यात आले.
विशाल धुमाळ यांनी आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून , लेखणीतून सामाजिक,राजकीय तसेच विविध सामाजिक विषयांवर प्रभावी असे लेखन केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पत्रकारितेतील पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर धुमाळ यांनी प्रभावीपणे अनेक विषयांवर लिखाण केले आहे . नांदेड येथील नरहर कुरुंदकर सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. देशातील विविध नामांकित पत्रकारांनी केलेल्या लेखणीचा आढावा घेऊन विविध क्षेत्रातील पत्रकारांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशाल धुमाळ यांना पत्रकारितेतील राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान झाल्याने त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
