ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

दौंडच्या देवकरवाडीतील सिद्धेश खळदे यांची भारतीय लष्करात २२व्या वर्षी लेफ्टनंट पदी निवड… थेट लेफ्टनंट पदावर जाणारा सिद्धेश दौंड तालुक्यातील पहिलाच मुलगा….

पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुक्यातील देवकरवाडी या छोट्याशा गावातील सिद्धेश दीपक खळदे यांची वयाच्या २२ वर्षी भारतीय लष्करात लेफ्टनंट या वर्ग एक पदी निवड झाली आहे. थेट या पदापर्यंत पोहोचणारा सिद्धेश हा दौंड तालुक्यातील पहिला मुलगा आहे.
देवकरवाडी येथील दीपक खळदे हे शेतकरी कुटुंबातील असून आपल्या एकुलता एक मुलाला देश सेवेसाठी लष्करात पाठवण्याचा निर्णय घेतला. सिद्धेशला देखील लष्करात जाण्याचे आकर्षण होते.
सिद्धेश शालेय शिक्षणातच अभ्यासामध्ये हुशार होता. वर्गामध्ये नेहमीच तो पहिल्या क्रमांकावर राहिला. दहावी नंतर मात्र त्याने औरंगाबाद येथे एसपीआय या संस्थेत प्रवेश घेतला. खास एनडीएसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात ही संस्था अग्रेसर असून येथील कर्नल उदय पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेशने अभ्यास सुरू केला. दुसऱ्या प्रयत्नांमध्ये त्याला एनडीए मध्ये प्रवेश मिळाला.
त्यानंतर खडकवासला येथे तीन वर्षाचे कठीण परिश्रमांचे प्रशिक्षण त्याने पूर्ण केले. त्यानंतर एक वर्ष डेहराडून इथं आय एम ए अर्थात इंडियन मिलिटरी अकॅडमीत तो भरती झाला.
हा काळ देखील अतिशय कष्टाचा मेहनतीचा होता. मात्र या परीक्षेमध्ये देखील तो विशेष प्राविण्य मिळवून पास झाला. याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती झळकत होता. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं, देश सेवा करण्याची इच्छा प्रत्यक्षात उतरत असताना थेट लेफ्टनंटपदावर नियुक्ती झाली याचा चेहऱ्यावरील आनंद लपवु शकला नाही तर आई-वडिलांना भेटताना आई-वडिलांचे आनंदाश्रू, कमी वयात मुलगा मोठा अधिकारी बनला याचा अभिमान व अभिमानाने त्यांची मान उंचावत होता.
सिद्धेश खळदे याची लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात आली असून नुकताच तो आपल्या देवकरवाडी या गावी आला होता. गावातील मुलगा मोठा अधिकारी बनल्याचा अभिमान गावकऱ्यांना होता. सिद्धेश हा थेट लेफ्टनंट पदावर जाणारा दौंड तालुक्यातील पहिलाच अधिकारी असल्यामुळे दौंडकरांना देखील याचा अभिमान वाटत आहे. तालुक्यामध्ये सर्व स्तरातून सिद्धेश याचे कौतुक करण्यात येत आहे.
………………………………….

*लष्करी सेवा ही नोकरी नाही तर ती एक जीवनशैली आहे. तो एक प्राऊड मोमेंट आहे. एवढ्या कमी वयात देशसेवा करण्याची संधी इतर कुठल्याही क्षेत्रात मिळत नाही.*
लेफ्टनंट सिद्धेश खळदे
…………………
*अभ्यासात सातत्य व मोबाईल पासून दुर राहिल्यास कोणत्याही मुलाला हे शक्य आहे तसेच सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी बरेच मार्ग आहेत पालकांनी सोशल मीडियाचा वापर भरती प्रक्रिया व त्याचे नियम समजून घेण्यासाठी केला पाहिजे*
– ज्योती खळदे(आई)

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]