पुणेरी टाइम्स….
मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त दौंड येथील योगेश्वरी हॉस्पीटल अँड आय सी यु यांच्या विद्यमानाने पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यावेळी योगेश्वरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सिध्दार्थ कुलकर्णी व संचालिका क्षितीजा कुलकर्णी व त्यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी पत्रकारांची आरोग्य तपासणी केली. व आरोग्य सल्ला दिला, यावेळी दौंड तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश वत्रे, राजू जगदाळे दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र जगताप, माजी अध्यक्ष रवींद्र खोरकर, रामदास डोंबे, संतोष काळे, मंगेश पायगुडे, अमर परदेशी,आदी पत्रकार उपस्थित होते.