पुणेरी टाइम्स टीम…
कुरकुंभ :- आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी गावच्या उपसरपंच पदी विदुलता रविंद्र निंबाळकर यांची निवड करण्यात आली . सरपंच पद जनतेतून निवडल्यानंतर उपसरपंचपदासाठी गुरुवार दि.२३ ) रोजी ग्रामपंचायत कार्यालय पांढरेवाडी येथे उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या ग्रामपंचायत मध्ये ११ सदस्य तर १ सरपंच असा कारभार पाहणार आहे. या वेळी विदुलता निंबाळकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. या निवडणुकीमध्ये एकमेव अर्ज दाखल झल्याने निंबाळकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुकीचे निरीक्षक म्हणून दौंड पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनेश अडसूळ यांनी काम पाहिले तर अध्यक्ष स्थानी सरपंच नीता राजेंद्र कोंडे यांनी काम पाहिले.यावेळी एकमेव अर्ज दाखल झाल्याने विदुलता निंबाळकर यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक निरीक्षक यांनी घोषित केले . यावेळी ग्रामसेवक संजय यादव, ग्रामपंचायत सदस्य वैशाली नवनाथ भागवत, फिरोज अकबर सय्यद श्रीकांत जाधव , वैशाली बाळू झगडे, पूनम राहुल चव्हाण , अनिल तुकाराम झगडे सुनिता संदीप झगडे, अमर रखमाजी गायकवाड, राजेंद्र ज्ञानदेव भागवत, विदोलता निंबाळकर, श्रद्धा महेंद्र जाधव ग्रामस्थ उपस्थित होते. निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी आपले पदभार स्वीकारले .यावेळी सदस्य व ग्रामस्थांनी नव्वर्चित सरपंच , उपसरपंच सदस्य यांचे अभिननंदन केले.