ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती तात्काळ बंद करा अन्यथा, बारामतीत संभाजी ब्रिगेडचे निवेदनाद्वारे मागणी

पुणेरी टाइम्स टीम (बारामती)

राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती, कंत्राटी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी पद्धतीने चालवायला देणे इत्यादी निर्णय तत्काळ रद्द करावे, अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना देण्यात आले. तरुण मुलांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे, असा शासनाचा उद्देश असताना सुद्धा आणि राज्यात वेगवेगळ्या विभागा अंतर्गत तीन लाख पदांच्या जास्त सरकारच्या सगळ्या विभागांतर्गत पदे रिक्त असताना सुद्धा कंत्राटी पद्धतीने तहसीलदार व इतर पदे भरणे हे तरुण मुला-मुलींच्या भविष्याशी व आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. सदर प्रक्रिया तत्काळ बंद करावी. अन्यथा महाराष्ट्रात प्रचंड उद्रेक होऊ शकतो. असे निवेदनात म्हटले आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, संभाजी ब्रिगेड कृषी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतिलाल काळकुटे, जिल्हा सरचिटणीस रमेश चव्हाण, संभाजी ब्रिगेड बारामती तालुकाध्यक्ष तुषार तुपे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष विनोद बोबडे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमर फुके, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेड तालुकाध्यक्ष जावेद शेख आदी उपस्थित होते.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]