- पुणेरी टाइम्स टीम…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केलीय. दुर्दैव आहे. त्या गटाचे अनेक लोक मनात म्हणतात पवार साहेब आम्हाला विठ्ठलासारखे आहेत. मग विठ्ठलाला तुम्ही देव घरातूनच बाहेर काढणार ही कुठली महाराष्ट्राची संस्कृती आहे. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. वडिलांना घरातून बाहेर काढणारं हे पहिलेच उदाहरण पाहिलं. असे वक्तव्य निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर खासदार सुळे यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावर सुनावणी झाली. मात्र सातत्याने तो गट म्हणतो आम्हालाच चिन्ह मिळणार आहे. ‘यांना परीक्षेस बसायच्या अगोदर निकाल माहीत आहे. त्यामुळे कुछ तो गडबड है’ कोणती तरी अदृश्य शक्ती दिल्लीवरून येऊन यांच्या कानात सांगतीय. असा टोला सुळे यांनी आज कुरकंभ येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार गटाला लगावला आहे.